Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

काँग्रेसकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन



नाशिक : खरा पंचनामा

नाशिक पदवीधर मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडण्याचे सत्र काही थांबत नाही. नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे यांचे काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. 

काल नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन केल्यानंतर आज त्यांचे पुत्र आणि याच मतदार संघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करत काँग्रेस पक्षाने त्यांचे निलंबन केले आहे.

सत्यजीत तांबे यांच्याकडे आमदार-खासदार यांसारखे कुठलेही पद नसल्याने त्यांच्याविरूध्दची कारवाई ही केंद्रीय शिस्तभंग समितीकडून नव्हे तर प्रदेश काँग्रेसच्या स्तरावरून होऊ शकते. अशी माहिती काँग्रेसचे केंद्रीय समितीचे सदस्य तथा प्रदेश महासचिव विनायक देशमुख यांनी दिली. 

त्यामुळे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत तांबे यांच्या विरोधात देखील निलंबनाची कारवाई होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.