दुःखद : सांगलीत वाहतूक पोलिसाचे हृदविकाराने निधन
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत पोलिस दलातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. वाहतूक शाखेकडील पोलिस नाईक परशुराम जाधव (वय 38 राहणार फौजदार गल्ली, सांगली) यांचे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
दिवंगत प्रशांत जाधव राष्ट्रीय कबड्डी खेळाडू होते. 2010 मध्ये ते सांगली पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनी यापूर्वी मुख्यालयात कर्तव्य बजावले होते. सध्या ते सांगली वाहतूक शाखेत सेवा बजावत होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. जाधव यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.