Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी

देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी



नवी दिल्ली : खरा पंचनामा

गुजरात दंगलिबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून देशात वादंग निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली आहे.

या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठांसह महाराष्ट्रातील एफटीआय आणि टीसमध्ये उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा वाद झाला. याच वादावर भाष्य करताना सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनसीसीच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण सर्वांना सावधगिरी बाळगण्याची गरज असून फूट पाडणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही. अनेक लोक भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एकता हीच भारताची ताकद असल्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीबीसीचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.