डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून
सातारा : खरा पंचनामा
सातारा शहरानजीक असलेल्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाढे गावतील एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्यात आला. मृत तरुण शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याचे समजते.
गोळीबारानंतर मारेकरी पसार झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल आहेत. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा
केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. मृत तरुण सातारा शहरातील असून सातारा जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.