Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

क्रिप्टोकरन्सी फसवणूक : मिरजेतील एकाला अटक

क्रिप्टोकरन्सी फसवणूक : मिरजेतील एकाला अटक



सांगली : खरा पंचनामा 

क्रिप्टोकरन्सी फसवणूकप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. अब्दुल महंमदसाब इनामदार (रा. मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयितास उद्या (ता. ३१) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित डॉ. इब्राहिम महंमदसाब इनामदार, त्याची पत्नी जस्मीन इब्राहिम इनामदार तीन महिन्यांपासून पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सादिक यासीन कोचरगी (शहापूर, इचलकरंजी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोचरगी यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. त्यांचे शेजारी असलेले लतीफ मुल्ला, त्यांचा मुलगा ओसामा यांची त्यांच्याशी ओळख होती. जानेवारी २०२२ मध्ये संशयित जस्मीन इनामदार, डॉ. इब्राहिम इनामदार व अब्दुल इनामदार यांच्याशी मुलानी ओळख करून दिली. संशयितांनी कोचरगीना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून कोचरगी यांनी बारा लाख, तर नईम जंगले यांचे १३ लाख, बंदेनवाज मुजावर यांचे १४ लाख, संभाजी जाधव यांचे २२ लाख अशी एकत्रित ६१ लाखांची गुंतवणूक केली. 

या सर्वांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापे टाकले, आलिशान गाडी जप्त केली. काही महत्त्वाची कागदपत्रे व रोकडही जप्त केली. आता त्‍यांची बँक खाती गोठवण्यात आलीत. अन्य मालमत्तांचा शोधही घेतला जात आहे.

दरम्यान, लतीफ मुल्ला यांच्यासह आणखी तिघांचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्याची पडताळणी करून ते दाखल करण्यात आले. कोट्यवधींची फसवणूक झाल्याची तक्रार तिघांनी नोंदवली आहे. त्यानंतर आज एकास अटक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.