मुंबईला मिळणार विशेष पोलिस आयुक्त?
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईला लवकरच विशेष पोलीस आयुक्त मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पदावर देवेन भारती यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. हे पद निर्माण करण्यात येणार असल्याची चर्चा मागील दिड- दोन महिन्याभरापासून पोलीस दलात सुरू आहे. मुंबईला विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यासाठी सरकारला का गरज वाटत असावी, दरम्यान, राज्य शासनाकडून आणि गृह खात्याकडून लवकरच विशेष पोलीस आयुक्तपदाचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विशेष आग्रही असल्याचीही चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
मुंबई पोलीस आयुक्त असताना या नवीन पदाची निर्मिती करून मुंबई पोलीस आयुक्तांचा भार कमी करण्यासाठी हे पद निर्माण केले जात आहे का? अशी चर्चा मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात सुरू आहे. या पदावर अधिका-यांची नेमणूक करण्यासाठी अनेक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी यांचे नाव चर्चेत आले आहे. या ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी देवेन भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे. तसेच या नवीन पदासाठी त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाकडून लवकरच विशेष पोलीस आयुक्तपदाचे आदेश काढण्यात येणार असल्याचे समजते. परंतु मुंबई पोलीस दलात या नव्या पदाची काय आवश्यकता भासली असावी? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांचा ताण कमी करण्यासाठी तसेच मुंबईतील वाढती लोकसंख्या त्याचसोबत वाढणारी गुन्हेगारी, वाढत्या राजकीय घडामोडी, मोर्चे, आंदोलने, मेळावे, व्हीआयपी मूव्हमेंट, महिलांची सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर सोबत मुंबईतील वाढती वाहनांची गर्दी हे सर्व पाहता मुंबईला विशेष पोलीस आयुक्तची नेमणूक करण्यात येणार असल्याचे एकीकडे बोलले जात आहे. मुंबई पोलीस दलात पोलीस आयुक्त या पदाव्यतिरिक्त मुंबईत ५ सहपोलीस आयुक्त आहेत. प्रशासन, गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभाग या पाच जागांवर सहपोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी असून त्यांच्यावर पोलीस आयुक्त हे पद आहेत. या पदासाठी देवेन भारती यांच्या नावाला पसंती सरकारकडून देण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.