पत्रकारामुळे कारभारावर अंकुश : खाडे ;शैलेश पेटकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
सांगली : खरा पंचनामा
राजकारण असो वा प्रशासन, पत्रकारांमुळे कारभारावर अंकुश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे पुरस्कार ना. खाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून दैनिक सकाळचे पत्रकार शैलेश पेटकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘सकाळ’चे सांगलीचे बातमीदार शैलेश पेटकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार महापालिका आयुक्त सुनिल पवार, उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार जनकल्याण समिती, उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. रवींद्र पाटील, उत्कृष्ट उद्योग सेवा पुरस्कार धनेश शेटे, उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार सचिन कुरकुटे, उत्कृष्ट टीव्ही पत्रकारिता पुरस्कार शंकर देवकुळे, उत्कृष्ट वृत्तनिवेदिका पुरस्कार सुप्रिया सरनाईक, क्रीडा पुरस्कार गिर्यारोहक संभाजी गुरव यांना प्रदान केला. नाना हलवाई यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी विविध शासकीय प्रशासनातील अधिकारी, पत्रकार, मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.