पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली, एकाला अटक
पुणे : खरा पंचनामा
ऐन वाहतुकीच्या वेळी भर रस्त्यात कार उभी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हुज्जत घातली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर धरून दमदाटी केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
हा प्रकार विमान नगर परिसरात घडला. या प्रकरणी एका कार चालकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अभिनंदन गायकवाड असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र डावरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे या आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने विमान नगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवत होते. अभिनंदन गायकवाड हा कार घेऊन रस्त्यात थांबला होता. यावेळी विलास सोंडे यांनी त्याला गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्याने विलास सोंडे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
तुला माझीच गाडी दिसली? का इतर गाड्या दिसत नाही का असे बोलत वाद घालण्यास सुरुवात केला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावर त्याने मी गाडी काढणार नाही काय करायचे ते करा मी तुमच्याकडे बघून घेतो असे म्हणून फिर्यादी यांची कॉलर ओढली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.