पोलिस स्थापना दिनानिमित्त सांगलीत पोलिसांचे संचलन
सांगली : खरा पंचनामा
जिल्हा पोलिस दलातर्फे आज महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनानिमित्त शहरात संचलन करण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संचलन सुरू झाले. शहरातील सर्व वाहने बँड पथक, विशेष पथकासह पोलिस दलाचा झेंडा घेवून सांगली शहरात संचलन करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ रोजी करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. त्यादिवसापासून दरवर्षी दोन जानेवारी हा पोलिस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे मोठे राज्य आहे. स्थापनादिनानिमित्त आठवडाभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.
सोमवारी येथील स्टेशन चौकातून वाहनांची रॅली काढण्यात आली. पोलिस अधीक्षक तेली यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरूवात केली. स्टेशन चौक, राजवाडा चौक, गणपती मंदिर परिसरातून रॅली निघाली. रॅलीत शहर उपाधीक्षक अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते. पुढील टप्प्यात शाळांसह विविध ठिकाणी जजागृती केली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.