… तरच शिंदे गटाला पाठिंबा : आंबेडकर
मुंबई : खरा पंचनामा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अडीच तास चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
आंबेडकर म्हणाले, प्रत्येक भेट ही राजकीय असते असे नसते. तसेच भाजपसोबतच्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने भाजपसोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करु. इंदू मिलमधील स्मारक संदर्भात मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाही. भाजपसोबत असलेल्या पक्षांना पाठिंबा देखील देणार नाही. परंतु शिंदे गट भाजपसोबत असलेल्या युतीतून बाहेर पडला तर पाठिंबा देण्याचा विचार करु असे आंबेडकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्यांनी भाष्य केलं. आम्ही तयार आहोत. आता उद्धव ठाकरे यांनी आपली युतीबाबतची भूमिका जाहीर करावी. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत जाहीर करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीने आमचा खिमा केला. आम्ही भाजपसोबत गेलो असतो तर आम्ही काँग्रस, राष्ट्रवादीचा खिमा केला असता असेही त्यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.