Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: कोल्हापूर एलसीबीची कारवाई

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: कोल्हापूर एलसीबीची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चौघाच्या टोळीकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्य तसेच कार आणि मोबाईल फोन असा 12 लाख 62 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर (ता. पन्हाळा) ही कारवाई करण्यात आली.

चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय 34, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय 40, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय 28, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली. तसेच बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (वय 38, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील विजय गुरखे यांना पांढऱ्या रंगाची कार (एमएच 09 डीएक्स 8888) बनावट नोटा घेऊन कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा लावला होता. यावेळी संशयित कार आडवून कारमधील संशयितांकडे चौकशी करण्यात आली. कसून चौकशी केल्यावर त्यांनी बनावट नोटा तयार केल्याची कबुली दिली.

पथकाने त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्यासह कार तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. संशयितविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील आणि रफिक आवळकर आणि सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासूदेव व सुरेश राठोड यांनी केली.

दरम्यान जयसिंगपूर येथील एका दादाच्या भाच्याला मिरजेत अशाच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सध्या त्या भाच्याचा मामा कोल्हापूर जिल्ह्यात क्राईमचा बादशाह आहे असे बोलले जात आहे. त्या बादशहाची सांगलीतील प्रकरणात चौकशी झाली होती. या प्रकरणात या मामा भाच्याचा हात आहे का याची चौकशी होण्याची गरज आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.