Breaking News

KP Banner

M4U News

रस्ते अडवून का कोणी आमदार होतं?; सांगलीकरांचा सवाल

रस्ते अडवून का कोणी आमदार होतं?; सांगलीकरांचा सवाल



सांगली : खरा पंचनामा

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच पक्षांना लागले आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक आतापासून कामाला लागले आहेत. त्यासाठी मतदारसंघात प्रमुख गावांमध्ये संपर्क कार्यालये सुरू करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी काही संपर्क कार्यालये सुरू झाली. मात्र संपूर्ण रस्ताच अडवून कोणी आमदार, खासदार होईल का असा संतप्त सवाल सांगलीकर विचारत आहेत.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्या त्या पक्षांचे इच्छुकही आता ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेली साडेतीन वर्षे गायब झालेले इच्छुक आता कार्यरत झाले आहेत. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी या इच्छुकांकडून संपर्क, सेवा, समाजकारण, अशा वेगवेगळ्या नावाखाली कार्यालये उघडली जात आहेत. 

निवडणुकीआधीपासून आपण जनसंपर्क साधत असल्याचा आव या इच्छुक नेत्यांकडून आणला जात आहे. यासाठी काही नेत्यांनी पंचतारांकित कार्यालये सांगली जिल्ह्यात सुरू केली आहेत. अशा कार्यालयांचे धुमधडाक्यात उदघाटन केले जात आहे. यासाठी बड्या नेत्यांना अगत्याने बोलावले जात आहे. 

निवडणूक पुर्वीच्या या तयारीचा सामान्य लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नेत्यांच्या पंचतारांकित कार्यालयांच्या उदघटनासाठी पूर्ण रस्ताच अडवला जात असल्याची तक्रार जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. मतदार नागरिकांनाच त्रास देऊन साहेब आमदार, खासदार कसे होणार असा प्रश्न सामान्य सांगलीकर विचारत आहे.

नागरिकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी त्यांच्याच दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण करणारे नेते खरंच आमदार, खासदार होणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.