राज्य उत्पादन शुल्कच्या जवानाला लाच घेताना अटक
सोलापूर : खरा पंचनामा
अवैध दारूच्या दाखल गुन्ह्यात जामीनासाठी मदत करतो म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती वीस हजार रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाला रंगेहाथ पकडण्यात आले. सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मलंग गुलाब तांबोळी (वय ३३) असे पकडलेल्या जवानाचे नाव आहे. तो महाराष्ट्र राज्य भरारी पथकात सेवेत आहे. सध्या जिल्ह्यात भरारी पथकाने अवैद्य दारू विक्रीवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे अनेक ढाबा चालकानी याचा धक्का घेतला आहे.
त्यात ही कारवाई झालेल्या उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे यातील तक्रारदार यांचे विरुध्द राज्य उत्पादन शुल्क सोलापूर येथे दारुबंदी अधिनियम अन्वये दाखल असलेल्या गुन्हात तक्रारदार यांना जामीनाच्या अनुषंगाने केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणुन तीस हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती वीस हजार रुपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, प्रमोद पकाले, अतुल घाडगे, उमेश पवार, स्वप्नील सत्रके यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.