Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीच्या कारवाईत अडथळा; तिघांना अटक

ईडीच्या कारवाईत अडथळा; तिघांना अटक



पिंपरी-चिंचवड : खरा पंचनामा

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्या घरातील ईडीच्या तपासात अडथळा आणल्याने आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले. तेव्हा त्यांच्या तपासात अमरच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी त्याच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला अटक केली आहे. अशोक साधुराम मूलचंदानी (वय 57), मनोहर साधुराम मूलचंदानी (वय 61) सागर मनोहर मूलचंदानी (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच आणखी दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. 

अमर मूलचंदानी हे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. रात्री ईडीने चौकशी पूर्ण केल्यावर ही तक्रार दिली होती. अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरीतमधील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचं वाटप केल्याचं आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.