वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या 24 वर्षीय मुलगीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली. नेहा दत्ताराम गिरप असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी नवघर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
मुलुंडच्या पूर्वेकडील नानेपाडा परीसरात नेहा आई वडिलांसोबत रहात होती. ती तणावात असल्याने तिच्यावर उपचार देखील सुरू होते अशी माहिती समोर येत आहे. ती उच्चशिक्षण घेत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या टेरेस वरून उडी घेत तिने आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेने गिरप कुटुंबियांना धक्का बसला आहे. घटना स्थळावरून सुसाईड नोट मिळाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.