सांगलीच्या खासदारांच्या ट्विटमध्ये चूक!
सांगली : खरा पंचनामा
काल गुरुवारी देशासह राज्यात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सांगलीचे खासदार संजय पाटील यांनीही याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र त्यातील चुकीमुळे त्या पोस्टची चर्चा होत आहे.
प्रजासत्ताकदिनी राजकीय नेते, अभिनेते, नागरिक यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. शिवाय अनेकांनी कर्तव्य पथवरील महाराष्ट्राच्या चित्ररथाबाबत पोस्टही शेअर केल्या होत्या. काल सांगलीचे खासदार संजय पाटील यांनीही चित्ररथाबाबत एक ट्विट केले होते.
मात्र या ट्विटमध्ये प्रजासत्ताक दिन ऐवजी प्रजासकट दिन असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे खासरदारांना प्रजासत्ताकदिन हा शब्दही लिहिता येत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.