क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात बड्या नेत्याचा जावई अडचणीत?
जालना : खरा पंचनामा
शिंदे गटातील मोठे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सी घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. यामुळे खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यात किरण खरात यांना क्रिप्टो करंसीमध्ये बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते.
त्यानुसार विजय झोल यांनीही पैसे गुंतवले, मात्र जागतिक मंदी असल्याने अनेकांचे पैसे बुडाले. यात विजय यांचेही पैसे बुडाल्याने झोल यांनी किरण खरात यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान किरण खरात यांनी त्यांची प्रॉपर्टी बळकावल्याचा आरोप केला आहे.
तर किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान खरात यांच्या तक्रारीवरून झोल यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.