कंठे परिवाराला सर्वतोपरी मदत करू : रामदास आठवले
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील प्रा. डॉ. रविंद्र कंठे रिपब्लिकन पक्षाचा खरा कार्यकर्ता होता. भारतीय विद्यार्थी संसद ही संघटना जिल्ह्यात रुजविण्याचे काम रवीने केले होते. रिपब्लिकन पक्ष आणि रामदास आठवले यांचा विचार त्याने तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला. अशा जुन्या कार्यकर्त्याच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. कंठे यांच्या परिवाराला पक्षाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले.
मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित शोकसभेत आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंठे यांचे सहकारी, कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय विद्यार्थी संसदचे माजी पदाधिकारी धम्मदीप ओहळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कंठे यांनी सांगली जिल्ह्यात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. सांगली जिल्ह्यात कंठे यांनी विद्यार्थी संघटना आणि चळवळ कशी रुजवली याचा आढावा घेतला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव, माजी महापौर विवेक कांबळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, परशुराम वाडेकर, प्रभात हेटकाळे, सचिन सव्वाखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.