Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा दणका!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा दणका! 



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठा दणका दिला आहे. अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोरील बॉम्बप्रकरणात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. या प्रकरणी एनआयएनं यापूर्वीच मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ज्यात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हेच मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 

प्रतिज्ञापत्रात पुढे असंही म्हटलं की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्ताच्या इमारतीत रचण्यात आला होता. या ठिकाणी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींमध्ये अनेक बैठक पार पडल्या. दरम्यान, एपीआय सचिन वाझेनं मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माना 45 लाख रुपये दिल्याचेही एमआयएच्या प्रतिज्ञापत्रात नमुद करण्यात आले आहे. 

त्यानंतर आज प्रदीप शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.