चोरीला गेलेले १५ लाखांचे मोबाईल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून अनेक मोबाईल चोरीला गेले होते. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अशा गुन्ह्यांचा शोध लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत 15 लाख रुपये किमतीचे 110 मोबाईल जप्त केले.
पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्या सूचनेनुसार सांगली पोलिसांनी अशाच गहाळ मोबाईलच्या नोंदी एकत्रित केल्या. सायबर शाखा व एलसीबीच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास केला. एक दोन नव्हे, तर तब्बल १५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल मिळवण्यात यश आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत ११० नागरीकांना त्यांचे मोबाईल सुस्थितीत परत दिले. त्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर जणू आनंदच पसरला.
मागील वर्षात जिल्ह्यात मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक नोंदी पोलिस ठाण्यात झाल्या. गर्दीच्या ठिकाणांसह अन्य ठिकाणी मोबाईल गहाळ झाले होते. तक्रारदारांनी नोंदी दिल्या. काही दिवस वाट पाहिली. मोबाईल परत मिळेल याची आशा सोडून दिली. पोलिस दलाने हे मोबाईल कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचेच, असा चंग बांधला. सायबर पोलिस व एलसीबी पथकाने तांत्रिक तपासाधारे शोध मोहीम राबवली.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व सायबरचे उपनिरिक्षक रोहिदास पवार यांनी स्वतंत्र पथके कार्यरत केली होती. पथकाने तांत्रिक तपास केला. कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १५ लाख रुपये किंमतीचे ११० मोबाईल शोधून ते हस्तगत करण्यात यश मिळविले.
निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक रोहीदास पवार, सचिन कनप, विकास भोसले, करण परदेशी, महादेव घेरडे, अमिन सय्यद, संदिप पाटील, प्रकाश पाटील, सचिन कोळी, अजय पाटील, अमोल शिरसागर, सुनिल मदने, स्वप्निल नायकवडे, विवेक साळुंखे, श्रीधर बागडी, निकास भोसले, इस्लामपुरचे अमोल सावंत, अलमगीर लतीफ, मिरजेचे सचिन सनदी, कडेगांवचे शिवाजी माळी, आष्टाचे अमोल शिंदे, नितीन पाटील, शिराळ्याचे नितीन यादव, महात्मा गांधी चौकीचे बसवराज कुंदगोळ, विश्रामबागचे धीरज यादव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.