पक्षांतर बंदीबाबत न्यायालयातील सुनावणी घटनाबाह्य
पुणे : खरा पंचनामा
विधानसभेचे अध्यक्ष आणि पक्षांतर बंदी प्रकरणाबाबत निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जे काही सुरू आहे, ते घटनाबाह्य आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. या प्रकरणावरील हस्तक्षेप याचिकेत हा मुद्दा मांडत मी युक्तिवाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून या विषयावर सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये काय मुद्दे मांडता येतील यावर आंबेडकर आणि ऍड. सरोदे यांच्यात बुधवारी चर्चा झाली. त्यानंतर आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आंबेडकर म्हणाले, "राज्यघटनेने अनेक संस्थांना स्वायत्तता दिली आहे. त्यात विधानसभेचा समावेश आहे. तिथे आत जे काही होते त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. विधानसभेत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार त्या सभागृहाचे सभापती किंवा त्या आसनावर बसेल त्या व्यक्तीला आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी अंतिम असते. निवडणूक आयोगाला घटनेने निकाल यासंदर्भात अधिकार दिले आहेत.
पक्षांतरबंदीचा निर्णय कोण घेणार असे विचारले असता आंबेडकर सांगितले की, याबाबतचा अधिकार त्यावेळी जे सभापती असतील तेच निर्णय घेणार व तो अंतिम निर्णय असेल, असेही आंबेडकर म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.