Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसाने वाचवले मुलाचे प्राण

पोलिसाने वाचवले मुलाचे प्राण 



मुंबई : खरा पंचनामा 

लोकल अपघातात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे शिपाई चेतन ताटू यांनी प्राण वाचविले आहेत. पोलिसांनी वेळीच त्या मुलाला उपचारासाठी दाखल केले. पोलिस शिपाई ताटू यांचे या कामाबाबत कौतुक केले जात आहे. 

चेतन ताटू हे वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. गेल्या आठवडय़ात ताटू हे वांद्रे रेल्वे स्थानक येथे गस्त करत होते. दुपारी वांद्रे ते माहीम रेल्वे स्थानकदरम्यान ट्रकमध्ये काही मुले उभी असल्याचे त्यांना दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने ते घटनास्थळी गेले. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. 

त्या मुलाला ताटू यांनी उचलले. मुलाला प्रचंड वेदना होत होत्या. ताटू यांनी त्या मुलाला उचलून ते धावत वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात आले. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने मुलाचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यावरून मुलाची ओळख पटली. 

मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो मुलगा लोकलमधून पडला की त्याला लोकलने धडक दिली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.