इस्टेट एजंट व्हायचे आहे, मग परीक्षा द्या!
मुंबई : खरा पंचनामा
रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा पास झाल्यावरच व्यवसायाचा परवाना मिळणार आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
रिअल इस्टेट एजंट हे राज्यातील मालमत्ता शोधणारे आणि मालक यांच्यातील मध्यस्थ म्हणून ओळखले जातात. या रिअल इस्टेट एजंटना आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र रेराने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. रेराने म्हटले आहे की, जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल तो अधिकृतपणे एजंट म्हणून काम करू शकेल. महाराष्ट्रात सध्या 37,746 प्रॉपर्टी एजंट आहेत.
महारेराने रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली आहे. एका परिपत्रकाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. रेराचा नियम लागू झाल्यानंतर प्राधिकरण केवळ वैध योग्यता प्रमाणपत्र असलेल्या एजंटनाच त्याच्या पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देणार आहे.
"रिअल इस्टेट एजंट्सच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगतता आणण्यासाठी, नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी आणि रिअल इस्टेट एजंट व्यावसायिकदृष्ट्या पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी महा रेराने संपूर्ण महाराष्ट्रात रिअल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना जाहीर केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.