वंचित बहुजन आघाडीशी अद्याप चर्चा नाही : शरद पवार
कोल्हापूर : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वंचित बहुजन आघाडीवर भूमिका स्पष्ट केली. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत. ते म्हणाले की तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न कशाला काढायचा.
एका सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला राज्यामध्ये 34 जागा मिळणार असल्याचा अंदाज दाखवण्यात येत आहे. यावर ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत आहे असेच सर्व्हेमधून दिसत आहे. कर्नाटकमध्ये भाजप राहिल की नाही अशीच चिन्हे आहेत. दरम्यान, त्यांनी विरोधकांच्या एकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांच्या एकीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अजूनही कोणताही निर्णय या संदर्भात झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या अगोदर सोडवाव्या लागतील. विरोधकां एकीबाबत दिल्लीमध्ये डायलॉग सुरू होईल.
त्यांनी सांगितले की, ममता यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधातील विरोध अजूनही कमी झालेला नाही. नेत्यांमागे तपास यंत्रणा लावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारावर गदा आणली जात आहे.
दरम्यान, त्यांनी पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील कोणाला पत्र लिहणार आहेत माहीत नाही. कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक झाली नव्हती का? पंढरपूरमध्ये झाली नव्हती का? आत्ताच कसे यांना सुचले कळत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, आमच्यामध्ये संवाद असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.