Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंजाबमधील तीन शार्प शूटर्सना अटक

पंजाबमधील तीन शार्प शूटर्सना अटक



मुंबई : खरा पंचनामा

पंजाब येथील माखन सिंग यांची हत्या करुन पसार झालेले तीन शार्प शूटर कल्याणजवळच्या मोहने परिसरात राहत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी तिन्ही शार्प शूटरना आज पहाटे अटक केली.

शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमनदीप कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खड़कपाड़ा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. हे तिघेही खत्री गँगशी संबंधित आहेत.

शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार हे तिघे शार्प शूटर पंजाब मधील मख्खन सिंग यांचे हत्या करून कल्याण जवळील मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघे पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य आहेत. मोहने परिसरात हे तिघेही खोली भाड्याने घेऊन राहत होते. पंजाब पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. 

मुंबई पोलिसांनी ही माहिती एटीएसला दिली. एटीएस आणि कल्याण खडकपाडा पोलिसांनी सापळा रचला. तब्बल दोनशे पोलिसांनी मोहने परिसरात धाड टाकून परिसर घेरून धरला. त्यानंतर या तिघांना पकडण्यात आले. आज पहाटे चार वाजता ही मोहिम फत्ते करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.