टार्गेटच्या टेन्शनने घेतला रायडरचा बळी!
मुंबई : खरा पंचनामा
वाहन विभागात गेल्यानंतर पंत खूपच ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी रायडरची संख्या वाढवली आहे. प्रत्येक रायडरला टार्गेट नेमून दिले आहे. टार्गेट पूर्ण न झाल्यास त्या रायडरची खैर नाही असा दमच त्यांनी दिला आहे. त्यामुळे रोजचे टार्गेट पूर्ण करताना रायडरना अनेक बळीचे बकरे शोधावे लागत आहेत. टार्गेट पूर्ण करताना त्यांची दमछाक होत आहे. या टार्गेटच्या टेन्शनमुळे एकाचा नुकताच बळी गेला आहे.
पंत साईड ब्रॅंचला होते तेव्हा एका मोठया खून प्रकरणात त्यांनी हात धुवून घेतले आहेत. साईड ब्रँचहुन बदली झाल्यावर पुन्हा त्यांना साईड ब्रॅंचलाच काम करावे लागले. त्यामुळे ते नाराज होते. सरकार बदलण्यासाठी त्यांनी देव पाण्यातही घातले होते. पण त्याआधीच देवाने त्यांचे ऐकले आणि त्यांना वाहन विभागाचा कार्यभार देण्यात आला.
तरी बाई आडवी येते म्हणूनही पंत नाराज होते. सरकार बदलल्यानंतर बाईही बदलून गेल्या. मग पंतांनी आढावा घेऊन रायडरची संख्या वाढवली. आणि प्रत्येक रायडरला पूर्वीच्या तुलनेत मोठे टार्गेट दिले. पण ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी रायडरना इच्छा नसताना अनेक जणांना बळीचे बकरे बनवावे लागले.
यातील काही प्रामाणिक रायडरना या गोष्टी पटत नव्हत्या पण नोकरी वाचवण्यासाठी धडपड करावी लागत होती. याच्यामुळे अनेकजण तणावाखाली होते. अनेकांना रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्या. तरीही टार्गेटच्या तणावामुळे एका रायडरचा बळी गेलाच.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.