Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सत्यजित तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी : पटोले

सत्यजित तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी : पटोले 



मुंबई : खरा पंचनामा 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला होता. त्यानंतर आज मविआने नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि नागपूरमध्ये सुधाकर आडबालेंना पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते मविआच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मविआचे पाचही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानपरिषद निवडणूक मविआ एकत्रपणे लढणार असल्याचेही यावेळी पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजपकडून केले जात राज्याची जनताच भाजपला धडा शिकवेल असे म्हणत थोरातांशी आम्ही संपर्कात असल्याचे ते म्हणाले. 

मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत पटोले म्हणाले की, देशाच्या पंतप्रधांनी गटाराचं उद्घाटन करणे म्हणजे भाजप एकप्रकारे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला धक्का लावत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून मोदींनी भाजपचा प्रचार करण्याशिवाय काहीचं केले नाही असा घणाघात पटोलेंनी केला. त्यामुळे मोदींनी ग्रामपंचायत, महापालिका किंवा इतर गोष्टींसाठी यावं हा त्यांचा प्रश्न आहे, असेही पटोले म्हणाले.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.