Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधान मोदींच्या सभेवेळी रिव्हॉल्व्हरसह फिरणारे दोघे ताब्यात

पंतप्रधान मोदींच्या सभेवेळी रिव्हॉल्व्हरसह फिरणारे दोघे ताब्यात



मुंबई : खरा पंचनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली. मुंबई पोलिसांनी या परिसरातून दोघांना अटक केली आहे. यापैकी एका व्यक्तीकडे घातक शस्त्र आढळले आहे. कटराम चंद्रगाई कावड असं त्याचे नाव आहे. तसेच सैन्यदलात सैनिक असल्याचे सांगणाऱ्या रामेश्वर मिश्रा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

39 वर्षीय कटराम हा हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचा कर्मचारी असून तो भिवंडी येथील रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे. मोदींच्या सभास्थळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यावेळी त्याला थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड सापडले. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पोहोचण्यापूर्वी सुमारे 90 मिनिटांपूर्वी नवी मुंबईतील एका 35 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर, अशाच आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

संशयिताने स्वत:ला लष्कराच्या 'गार्ड्स रेजिमेंट'मधील नाईक असल्याचं सांगून अतिसुरक्षा असलेल्या व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. रामेश्वर मिश्रा असं अटक करण्यात आलेल्याचं नाव असून त्याला मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी संशय आल्यामुळे थांबवलं होतं. सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत असल्याने गुन्हे शाखेने त्याच्यावर अर्धा तास नजर ठेवली होती, त्यानंतर त्याला थांबवून ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.