उद्धव ठाकरे शिंदे गटाला देणार धक्का!
मुंबई : खरा पंचनामा
उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी निवडणुक आयोगात आणि सर्वोच्च न्यायालायात वाद सुरू आहे. त्यातच मुळ शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीची अर्थात उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाची मुदत उद्या २३ जानेवारी रोजी संपत आहे. ठाकरे गटाने यासाठी वेगळीच आखणी केली आहे. ठाकरे गटामार्फत उद्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोग या बैठकीतील निर्णयाला मंजुरी देणार की नाही याची उत्सुकता लागून राहिली आहे.
याबाबत निवडणूक आयोगात देखील युक्तीवाद झाला. मात्र निवडणूक आयोगाने यावर काहीही भूमिका न घेतल्याने ठाकरे गटाकडून कार्यकारणीची बैठकीच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांनी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली होती. अन्यथा सद्यस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे, मग यानंतरही त्यांच कार्याध्यक्षपद कायम राहणार का, हा सर्वात मोठा प्रश्न होता.
यावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे गटाने उद्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचं आयोजन केल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. अर्थात या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढू शकतो. मात्र या बैठकीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.