Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूरात भावाने केला बहिणीचा खून?

कोल्हापूरात भावाने केला बहिणीचा खून?



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यात भावानेच बहिणीचा खून केल्याचे समजते. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. दिवसभरात झालेल्या दुसऱ्या खुनाच्या घटनेनं कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.

सध्या पोलिसांकडून या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू असून, अद्याप मृतदेह सापडलेला नाही. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. हा तरुण दारूच्या नशेत असून, दारूच्या नशेत बहिणीची हत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

एका तरुणाने आपण बहिणीची हत्या केल्याचा दावा केला आहे. तरुण दारूच्या नशेत आहे. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून तरुणाने दावा केलेल्या मृत महिलेचा शोध सुरू आहे. या तरुणाने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्तानं गीता-प्रताप असं लिहीलं आहे. 

सध्या या तरुणाची चौकशी सुरू असून, त्याने हत्या का केली? पोत्यावर रक्तानं गीता प्रताप असं नाव त्यानं का लिहीलं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.