तृतीयपंथीयावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार
ठाणे : खरा पंचनामा
तृतीयपंथीवर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी दोन नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय २३), शाहिद (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
एका खोलीत नेऊन बेदम मारहाण करत दोघा नराधमांनी १९ वर्षीय तृतीयपंतियावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील आजदनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली आहे. १९ वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहते. तर दोन्ही संशयित त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती.
६ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी, पाव, आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे असे, बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीत घेऊन आला.
त्यानंतर खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास अनसैर्गिक अत्याचार केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.