Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी

आमदार बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी



अमरावती : खरा पंचनामा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली.

अपघातानंतर त्यांना तातडीने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातात आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बच्चू कडू डिव्हायडरच्या दिशेने फेकले गेले.

दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपली प्रकृती ठीक असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते. सध्या बच्चू कडू मंत्रिपदापासून उपेक्षित आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.