Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न



नांदेड : खरा पंचनामा

ड्युटीवरुन घरी परतत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीला चार महिने बाकी असताना त्यांनी हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. काही माजी सैनिकांनी लोकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश मिळवले.

शेषराव राठोड असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, शेषराव यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शेषराव राठोड नांदेड पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेला केवळ चार महिनेच बाकी आहेत. गुरुवारी ड्युटीवरुन घरी परतत असताना गोदावरी नदीवरील गोवर्धन घाट उड्डानपुलावरुन त्यांनी उडी घेतली.

शेषराव यांनी पोलीस गणवेशातच नदीत उडी घेतली. यावेळी गोवर्धन घाट उड्डानपुलावर उपस्थित अनेक लोकांनी त्यांनी नदीत उडी घेताना पाहिले. पाण्यात ते तडफडत असताना एका माजी सैनिकाने पाहिले. माजी सैनिक असलेले बलजितसिंग बावरी यांनी अन्य लोकांच्या मदतीने शेषराव यांना पाण्यातून बाहेर काढले. 

रुग्णवाहिका यायला उशीर होत असल्याने बावरी आणि अन्य लोकांनी त्यांना तात्काळ रिक्षातून श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.