न्यायालयातच पोलिसाने फोडले वकिलाचे तोंड!
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद सुरू असतात. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली असून पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. न्यायालय आवारातच पोलिसाने वकिलाचे तोंड फोडल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. यादरम्यान पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली. संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. यावरून दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दीक वाद झाला. त्यानंतर वाद वाढत गेला व पोलिसांनी संबंधित वकिलाचे तोंड फोडल्याची माहिती आहे.
या घटनेचा वकील संघटनांकडून निषेध केला जात आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही वकिलांकडून केली जात असल्याची माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.