Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीला सापडले घबाड!

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीला सापडले घबाड! 



पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा 

पिंपरी चिंचवडमध्ये दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीच्या घरी ईडीने छापा टाकून 4 जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईमध्ये ईडीला भलेमोठे घबाड सापडले आहे. 2 कोटींचे हिरे आणि रोख रकमेचा यामध्ये समावेश आहे. तसंच 4 आलिशान कारही जप्त केल्या आहेत. 

दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये ईडीकडून सुरू असलेल्या छापेमारी दरम्यान दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीसह त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरोधात तपास कामात अडथला निर्माण करणे तसंच लपून बसून नियमबाह्य कर्ज प्रकरणातील पुरावे नष्ट केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

ईडीचे सर्च ऑपरेशन सुरू असताना घरातच लपून बसलेल्या अमर मुचंदाणी याने मोबाईलमधील पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ईडीकडून तक्रार देण्यात आल्यानंतर अमर मुलचंदाणी आणि त्याच्या कुटुंबातील 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अमर मुलचंदानी हे वैद्यकीय कारणास्तव ससूनमध्ये पोलिसांच्या निगराणीत उपचार घेत आहे. 

गुन्हे दाखल असलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी स्वतः याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अशोक साधुराम मुलचंदानी, मनोहर साधुराम मुलचंदानी, सागर मनोहर मुलचंदानी तीन जणांना अटक करण्यात आली. छापेमारी दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर सुमारे साडे आठ तास अमर मुलचंदाणी हा वरील मजल्याच्या खोलीत लपून बसला होता आणि अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.