सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना 'उत्तम जीवन रक्षा पदक'
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना राष्ट्रपतींकडून उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूवर्संध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली. एकूण ४३ जणांना पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून केवळ श्री. फडणीस यांची निवड करण्यात आली आहे. दीड लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सहाय्यक निरीक्षक फडणीस राज्याच्या पोलिस दलात २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुगर्, कोल्हापूर आदी जिल्ह्यात सेवा बजावली. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये सेवेत रूजू झाले. त्यानंतर त्यांनी सांगली एलसीबीत काम केले. सध्या ते मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून कायर्रत आहेत.
३० नोव्हेंबर २०२१ रोजी मिरजेतील औद्योगिक वसाहतीतील केमीकल कारखान्याला आग लागली होती. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक फडणीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांचे प्राण वाचवले. आगीच्या लोटांमध्ये फसलेल्या या लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वाचवले होते. यामध्ये ते भाजून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडे त्यांना पदक देण्यासंदभार्त प्रस्ताव पाठवला होता. श्री. फडणीस यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून केवळ श्री. फडणीस यांनाच हे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यासह राज्यातून अभिनंदन होत आहे. लवकरच त्यांना राज्यपालांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या अधिकारी, कमर्चाऱ्यांना राष्ट्रपतींकडून जीवन रक्षा पदक देण्यात येते. यावर्षी ७ जणांना सवोर्त्तम जीव रक्षा पदक, आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक तर २८ जणांना जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.