सांगलीत राष्ट्रध्वजाचा अवमान; प्राथमिक शिक्षकावर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
देशासह राज्यात गुरुवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील बालगाव येथे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. याप्रकरणी एका प्राथमिक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत तालुक्यातील बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांच्यावर राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय माळी यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रभाकर सलगर यांनी ध्वजारोहणची तयारी केली होती. दरम्यान, ध्वजारोहणसाठी दुंडाप्पा कोटी यांनी ध्वजाची दोरी खेचली. त्यावेळी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर प्रभाकर सलगर हे जिल्हा परिषद शिक्षक असुन त्यांना राष्ट्रध्वज फडकविण्या विषयीचे ज्ञान असताना देखील त्यांनी योग्य ते काम केले नाही. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या अवमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.