विनयभंग करणारा एसीपी अखेर निलंबित
औरंगाबाद : खरा पंचनामा
औरंगाबाद शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याची हाक खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. तसेच निलंबन असेपर्यंत त्यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहे.
एका ओळखीच्या व्यक्तीला घरी सोडण्याची विनंती करून, गाडीत बसल्यावर त्याच्या पत्नीचा ढुमे यांनी विनयभंग केला होता. एवढचं नाही तर पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण देखील केली होती. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ढुमे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अवघ्या चार तासात त्यांना जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्यावर गृहविभागाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. तर शुक्रवारी याविरोधात शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे वाढता संताप पाहता अखेर गृहविभागाकडून ढुमे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत गृहविभागाने लेखी आदेश देखील काढले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.