दरीबडचीत जावयाने केला सासऱ्याचा खून
जत : खरा पंचनामा
जत तालुक्यातील दारीबडची येथे जावयाने कोयत्यासारख्या धारधार हत्याराने डोक्यात, मानेवर वार करुन सासऱ्याचा निर्घृणपणे खून केला. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. आप्पासो आण्णाप्पा मल्लाड (वय 46) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन रुद्राप्पा बलोळी, मिलन रुद्राप्पा बलोळी, दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मायाश्री आप्पासो मल्लाड यांनी फिर्याद दिली आहे. सर्व संशयित शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मल्लाड यांच्या घरी आले. त्यांनी चर्चा करायची असल्याचे सांगून आप्पासो यांना घराबाहेर बोलावले.
घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर सचिन याने माझ्या पत्नीला नांदवायला का पाठवत नाही असा जाब विचारला. नंतर संशयितांनी कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात, मानेवर, चेहऱ्यावर, कानावर, हातावर वार केले. वार वर्मी बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आप्पासो यांचा खून केल्यानंतर सर्व संशयित एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पसार झाले. याची माहिती मिळताच जतचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संशयितांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक रामाघरे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.