मी तस म्हणलोच नाही : जयंत पाटील
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत एक विधान केले होते. त्यावर त्यांनी ही शरद पवार यांची राजकीय खेळी असू शकते. असं देखील म्हटलं होतं. आता जयंत पाटील यांनी त्यांच्या या विधानावर घूमजाव केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो माझा कयास आहे.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत. शरद पवार यांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवार यांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो.’
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पाटील म्हणाले होते की, ‘मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.
राष्ट्रपती राजवट उठविल्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही खेळी असू शकते.
त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा काही जास्त महत्व आहे.
त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आजही महत्व नाही.
त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणुन काम केले आहे. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार फुटल्याने सरकार कोसळले. पण राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे
यांना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली.’ असे वक्तव्य केले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.