काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार
नांदेड : खरा पंचनामा
नांदेड शहरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शहरातील बाफना उड्डानपुलावर सोमवारी रात्री ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड असे या गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
गायकवाड स्कुटीवरून मगनपूरा येथून रात्री घरी जात होत्या. उड्डानपुलावर एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड जखमी झाल्या. त्यांच्या खांद्याला एक गोळी लागली आहे. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सदर घटना ही जुन्या वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
स्थानिक राजकारणात अशा घटना वारंवार होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी बीड जिल्ह्यात विरोधात काम केले म्हणून तिघांना बेदम मारहान करण्यात आली होती. त्यातच एकाचा बेदम मार बसल्याने उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. ही घटना बीडच्या आष्टी शहरात घडली होती.
त्यावरून आता स्थानिक राजकारणात कशाचा तरी राग धरत पदाधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.