Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या

कोल्हापुरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी या बदल्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी रात्री उशिरा हे आदेश दिले आहेत.

कोल्हापूर एलसीबीचे निरीक्षक संजय गोर्ले यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांची स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 

हातकणंगले ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांची बदली सुरक्षा शाखा कोल्हापूर याठिकाणी करण्यात आली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची बदली उजळाईवाडी विमानतळ या ठिकाणी करण्यात आली आहे. या दोघांच्याही बदल्या कसुरीमुळे करण्यात आल्या आहेत.

नियंत्रण कक्षाकडील सत्यराव हाके यांची इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षातील निरीक्षक अनिल तनपुरे यांची कोल्हापुरातील राजारामपुरी ठाण्याकडे, स्वाती गायकवाड यांची राधानगरी, अजय सिंदकर यांची भुदरगडला, औदुंबर पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे बदली करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षाकडील महादेव तोंदले यांची हातकणंगले पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. गगनबावडा पोलिस ठाण्याचे रणजित पाटील यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाकडील सतीश गुरव यांची जुना राजवाडा, श्रीकृष्ण कटकधोंड यांची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. 

पन्हाळाचे निरीक्षक अरविंद काळे यांची करवीर, राजारामपुरीचे ईश्वर ओमासे यांची कागल, वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी यांची पन्हाळा येथे तर स्वाती गायकवाड यांची राधानगरी येथे बदली करण्यात आली आहे.

गगनबावडा येथील सहायक निरीक्षक रणजित पाटील यांची जयसिंगपूर, एलसीबीचे किरण भोसले यांची जुना राजवाडा, शिवानंद कुंभार यांची शाहूपुरी येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.