भाजपच्या माजी आमदारच्या घराजवळील मृतदेहाचे गूढ उकलले!
सातारा : खरा पंचनामा
सातारा येथील भाजपाच्या माजी आमदार कांता नलावडे यांच्या बंद बंगल्याच्या आवारात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेचा खून करून तिचा मृतदेह पुरण्यात आला होता. दागिन्यांसाठी जिल्ह्यातीलच एका महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगल शिवाजी शिंदे (रा. संगम माहुली, ता. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगल या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे या प्रकरणाचा तपास करत होते. तपासात त्यांना मंगल शिंदे यांचा खून करून मृतदेह माजी आमदार कांता नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील आवारात पुरला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
त्यानंतर या घटनेचे गूढ उकलले. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मंगल शिंदे यांचा खून करणाऱ्या संशयिताचे नाव देखील निष्पन्न झाले आहे. शिंदे यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याचे डोरले काढून घेतल्यानंतर डोक्यात खोरे मारून संशयिताने त्यांचा खून केला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.