Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पैशाच्या लोभानेच बँक मॅनेजरचा खून

पैशाच्या लोभानेच बँक मॅनेजरचा खून 



बुलढाणा : खरा पंचनामा 

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव येथील एसबीआय बँक मॅनेजरच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. मॅनेजर उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील ज्या लॉजवर मुक्कामी असायचे तेथील लॉज मँनेजरनेच पैशाचे लोभानेच पाटील यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

खून करून पसार झालेला संशयित गणेश देशमाने (रा. चिखली) याला एलसीबीच्या पथकाने डोंबिवली येथून अटक केली आहे. मुंबई येथील रहिवासी व बुलढाणा जिल्ह्यात तात्पुरत्या नियुक्तीवर आलेले हिरडव (ता. लोणार) येथील एसबीआय शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील (वय ३६) यांचा मृतदेह १ जानेवारीच्या सायंकाळी मेहकर शहराजवळील सारंगपूर फाट्यावरील ऊसाच्या एका शेतात आढळून आला होता. 

अज्ञात मारेकऱ्याने पाटील यांच्या खुनासाठी वापरलेला चाकू तसेच मयत उत्कर्ष पाटील यांचा मोबाईल व अज्ञात आरोपीचा मोबाईल असे दोन मोबाईल्सही घटनास्थळी मृतदेहाजवळ आढळून आले होते. त्यातील एक मोबाईल हा मेहकर शहरात एका लॉजवर मॅनेजर म्हणून काम करणा-या गणेश देशमाने याचा असल्याचे तपासात समोर आले होते. खून करुन आरोपी देशमाने हा पसार झाला होता. पोलिसांना तपासादरम्यान आरोपीच्या पत्नीने सांगितले की, आरोपीने खुनानंतर रक्ताने माखलेले त्याचे कपडे डोणगाव रस्त्यावरील क्रीडा संकूलाजवळ फेकून दिले होते. पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले आहेत. त्याकामी पत्नीने आरोपी पतीला मदत केल्याने तिलाही सहआरोपी केले आहे. 

उत्कर्ष पाटील यांचा खुन झाल्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डद्वारे दोनवेळा पैसे काढल्याचे झाल्याचे तपासात समोर आले आहे. लॉजचा मॅनेजर गणेश देशमानेशी त्यांची ओळख झाली होती. लॉजवरील अन्य ग्राहक बाहेर जातांना रूमची चावी काउंटरवर जमा करायचे. मात्र पाटील हे चावी सोबत घेऊन जात असल्यामुळे त्यांचेकडे (त्यांचे खात्यात) भरपूर पैसे असावेत, त्यांनी सेवेचा राजीनामा सादर केलेला असल्याने मोठ्या रकमेचे घबाड हाती लागू शकेल अशा लालसेने गणेश देशमाने याने पाटील यांचा खून करण्याचा कट रचुन त्यांचा खून केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.