अपघाताबाबत बच्चू कडू यांची आली प्रतिक्रिया
मुंबई : खरा पंचनामा
प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली गेली. आता स्वत: बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या आहेत. माझा अपघातच झालेला आहे, घातपाताचा काही संबंध नाही. वाहन चालकाची चुकी नाही तर मीच गोंधळलो होतो. अपघाताचं राजकारण केलं गेलं. शहानिशा करून राजकारण करावे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
अपघातानंतर पहिल्यांदा बच्चू कडू आज औरंगाबाद येथील शिक्षक मतदारसंघाच्या प्रहारच्या उमेदवाराच्या प्रराचारासाठी जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले.
अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक येथील शिक्षक व पदवीधर निवडणुकीमध्ये आम्ही भाजपा व शिंदे गटासोबत आहोत. आम्ही ताकदीने काम करू तशी आमच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक देखील झाली आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.