महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय.
17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर राहिलाय. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' यावर अधारित चित्ररथ होता. या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. गोंधळींचं प्रमुख वाद्य आहे संबळ हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे सगळे तुळजाभवानीचे गोंधळी चित्ररथाच्या समोर आहेत.
त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात आला आहे. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. पोतराजसुद्धा चित्ररथाच्या होते. एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.