Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम फिर्यादीला दिली परत!

ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम फिर्यादीला दिली परत! 



सांगली : खरा पंचनामा 

बॅक खाते बंद होणार असल्याचा मेसेज पाठवून सोबत पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून एकाची २ लाख ८७ हजार ८९१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. परंतु सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास करुन रक्कम तक्रारदारास परत मिळवून देण्यात यश मिळविले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी तपास करण्यात आला. रक्कम परत मिळाल्यानंतर फिर्यादीनी डॉ. तेली यांचे आभार मानत त्यांचा सत्कारही केला. 

याबाबत विनय रघूनाथ शिंदे (रा. विजयनगर, विश्रामबाग सांगली ) यांनी फिर्याद दाखल केली होती. दि. ८ जानेवारी रोजी विनय शिंदे यांना मोबाईलवर एक संदेश आला होता. त्यामध्ये त्यांचे बॅँक खाते बंद होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदेश समवेत एक लिंक आली होती. ती लिंक उघडून शिंदे यांनी त्यामध्ये बॅँकेसंदर्भातील माहिती भरल्यानंतर काही वेळात त्यांच्या बॅँक खात्यातील २ लाख ८७ हजार ८९१ रुपये परस्पर काढण्यात आल्याचा संदेश त्यांना मिळाला. यानंतर तातडीने शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तेथे तक्रार नोंदविली. 

पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार यांनी पोलीस कर्मचारी महादेव घेरडे आणि योगिता लोखंडे यांच्या सहकार्याने या घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून झालेल्या व्यवहाराबाबत संबंधित बॅँकेशी पत्रव्यवहार केला. पोलीस तपासात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने एका ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवर  खरेदी केल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी शॉपिंग साईटचे नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधून ई-मेल च्या माध्यमातून त्यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. तसेच फसवणूक झालेल्या रक्कमेतून खरेदी केलेली वस्तू संबंधिताला पाठवू नये असे सांगितले.

त्याचप्रमाणे फसवणूक झालेली रक्कम नोडल अधिकाऱ्यांना पुन्हा तक्रारदार यांचे बैंक अकाउंट वरती परत पाठविण्याचे आवाहन केले. त्यास सकारात्मक प्रतिदास देत रक्कम नोडल अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या बॅँक खात्यावर पाठविली. यामुळे फसवणूक झालेल्या रकमेपैकी २ लाख ६२ हजार ८९१  रुपये परत मिळविण्यास सायबर पोलीस ठाणेस यश आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.