उद्योगांवरून जयंत पाटील यांचे राज्य सरकारविरोधात सूचक ट्विट!
मुंबई : खरा पंचनामा
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण चंगलेच तापले होते. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. अधिवेशनानंतर राज्यातील गुंतवणुकीचा विषय मागे पडला होता. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे.
महराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेले त्यावेळी राज्यात सरकार शिंदे फडणवीस यांचे होते. उद्योग बाहेर जाताच सोशल मीडियावर सरकार विरोधात अनेक मिम्स, मेसेजेस, बॅनर्स फिरू लागले होते. आता जयंत पाटील यांनी देखील ट्विटद्वारे पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. "फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा !" अशा कॅप्शनखाली पाटील यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तीन बॅनर्स दिसत आहेत.
एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे असं लिहिलंय तर दुसऱ्यावर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलय. तर तिसऱ्या बॅनरवर मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो असून त्यावर 'इनव्हेसमेंट मागोगे युपी गुजरात को देंगे' असं लिहिलं आहे.
जयंत पाटील यांनी खास शैलीतून हे ट्विट केले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.