आईनेच घोटला तीन दिवसांच्या बाळाचा गळा!
लातूर : खरा पंचनामा
पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाली, म्हणून २५ वर्षीय आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा घोटून खून केल्याचा प्रकार लातूर तालुक्यात घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी ( ता. लोहारा) येथील रेखा किसन चव्हाण ही महिला सध्या लातूर तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्याला आहे. ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती. तिला पहिली मुलगी असून, ती काटगाव वसंतनगर तांडा येथे २७ डिसेंबर रोजीं नजीकच्या कासार जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल झाली. दरम्यान, आरोग्य केंद्रात तिने गोंडस मुलीला जन्म दिला.
दुसऱ्यावेळीही मुलगी झाल्याने रेखा चव्हाण नाराज होती. त्याच रागातून तिने २९ डिसेंबर रोजी रुमालाने तीन दिवसाच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केला. गातेगाव पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेनेच बाळाचा खून केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आईला अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.