Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न!

महिला नायब तहसीलदार यांना पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न!



बीड : खरा पंचनामा

बीड जिल्ह्यतील केजमध्ये नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.  आशा वाघ या केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत. भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याने  बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
नायब तहसीलदार आशा वाघ शुक्रवारी दुपारी जेवण करुन तहसील कार्यालयाकडे मोपेडवरुन येत होत्या.
त्याचवेळी एका कारने त्यांचा रस्ता आडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधून आणलेले पेट्रोल वाघ यांच्यावर टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यात आशा वाघ थोडक्यात बचावल्या. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.